आई

आई तुझ्यासाठी मी काय लिहू,
कसे लिहू आणि किती लिहू,
तुझ्या महतीसाठी शब्दच अपुरे आहेत,
तुझ्या समोर सगळे जगच फिके आहे ।।

आई तुझ्याबद्दल बोलायला मला,
शब्दच उरणार नाहीत,
आणि तुझे उपकार फेडायला मला
हजारो जन्म पुरणार नाहीत ।।

आजपर्यंत तू माझा प्रत्येक हट्ट पूर्ण केला,
अगदी निस्वार्थ भावनेने,
तसेच माझी काळजी घेतलीस निष्ठेने ।।

माझ्या आयुष्यातील शांतता तू,
माझ्या मनातील गारवा तू ,
अंधाऱ्या आकाशातील चंद्र तू ,
ढगाळ वातावरणातील पावसाच्या सरी तू ,

मका वाट दाखवणारा रस्ता तू ,
माझा भास तू, माझा श्वास तू ,
माझ्या कवितेतील शब्द तू,
माझी भक्ती तू , माझी शक्ती तू ,
माझ्या चेहऱ्यावरील हास्य तू !!!

Related Articles

आई

आई तुझ्यासाठी मी काय लिहू, आणि किती लिहू, तुझ्या महितीसाठी शब्दच अपुरे आहेत, तुझ्यासमोर सगळे जगच फिके आहे।। आई तुझ्या बद्दल बोलायला मला शब्दच उरणार…

Marathi Prem Kavita

माझ्याशी आजकाल हे घडते विचित्र आहे माझ्याशी आजकाल हे घडते विचित्र आहे , डोळ्यापुढे माझ्या गा तुझेच चित्र आहे तुझे रूपवर्णन करण्यापलीकडे शब्दही अपुरे ,…

प्रेम

असतील तुझ्या साठी हे फक्त दोन शब्द.. पण मी तुला मानलंय माझं आयुष्य, तुझं नाव जरी कोणाकडून ऐकलं, तर चेहऱ्यावर येत माझ्या हास्य… तू आहेस…

Responses

New Report

Close