पदर माझ्या माईचा

March 8, 2021 in मराठी कविता

माझ्यासाठी तो राब राबतोया ,
अन् उन्हातात तो खपतोया ,
काट्याकुट्यात ही झटतोया ,
असा पदर माझ्या माईचा….

जीव तीचा तुट तुट तुटतोया ,
आपल्या लेकरासाठी तो रडतोया ,
स्वताःच्या सुखालेही गाडतोया
असा पदर माझ्या माईचा …

दुःखाच्या डोंगरांना पाडतोया ,
काटे रस्तातले माझ्या झाडतोया ,
संकटालाही तो नडतोया ,
असा पदर माझ्या माईचा….

सावली मस्तकी माझ्या धरतोया ,
जीवनातील व्यथा दुर करतोया ,
माझ्यासाठी तो मर मर मरतोया ,
असा पदर माझ्या माईचा….

सदैव कष्टात तो राहतोया ,
गीत सुखाचे नेहमी गातोया ,
माझ्या यशाचं सपान पाहतोया ,
असा पदर माझ्या माईचा….

मायाममता तो मजवर करतोया ,
छाया सुखाची नेहमी धरतोया ,
लाडाने डोहीवर फिरतोया ,
असा पदर माझ्या माईचा….

✍🏻प्रमोद उगले(पत्रकार)
Pramodugale.blogspot.com