का दूर राहतेस तू

का दूर राहतेस तू , स्वप्नात पटकन येत जा डोळ्यांच्या पडद्यामागे , सुंदर आठवणी देत जा

तुझी आठवण आली कि
जीव कासावीस होतो
whatsapp facebook चे फोटो बघून तात्पुरता मी खुश होतो
का दूर राहतेस तू , स्वप्नात पटकन येत जा डोळ्यांच्या पडद्यामागे , सुंदर आठवणी देत जा

ऑफिस मध्ये काम करतानाही तुझा विसर पडत नाही

मित्रांनी मुद्दाम चिडवल्यावर हसल्याशिवाय राहवत नाही
डोळ्यांच्या पडद्यामागे,सुंदर आठवणी देत जा

उठल्यापासून झोपेपर्यंत माझाच विचार करतेस
उठलास कारे , जेवलास कारे काळजी करत राहतेस
का दूर राहतेस तू , स्वप्नात पटकन येत जा डोळ्यांच्या पडद्यामागे , सुंदर आठवणी देत जा

आकाशातल्या ताऱ्यांकडे एकटाच मी बघत बसतो
पिक्चर मधल्या हिरो सारखा चंद्रामध्ये तुला शोधतो
का दूर राहतेस तू , स्वप्नात पटकन येत जा डोळ्यांच्या पडद्यामागे , सुंदर आठवणी देत जा

झोप येत नसली कि
तुझा विचार येतो माझ्याशिवाय कशी असशील तू याचाच विचार मी करत बसतो
का दूर राहतेस तू , स्वप्नात पटकन येत जा डोळ्यांच्या पडद्यामागे , सुंदर आठवणी देत जा

काल रात्री स्वप्नात माझ्या तू आली होतीस
कधी सोडणार तर नाई नारे मला असं अचानक विचारू लागली होतीस

त्यावर तुला जवळ घेऊन सांत्वन तुझे केले होते सोडण्यासाठीच कि काय वेडे,प्रेम तुझ्यावर केले होते !!!!

उत्तर माझे ऐकून
चेहऱ्यावर तुझ्या हास्य उमलले अन घड्याळाच्या आवाजाने माझे डोळे उघडले

समोर तू नाई म्हणल्यावर काय सांगू कसे
वाटलेऎऎए

सांग न गा मला
का दूर राहतेस तू स्वप्नातच माझ्या राहत जा डोळ्यांच्या पडद्यामागे , सुंदर आठवणी देत जा

लगातार अपडेट रहने के लिए सावन से फ़ेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, पिन्टरेस्ट पर जुड़े| 

यदि आपको सावन पर किसी भी प्रकार की समस्या आती है तो हमें हमारे फ़ेसबुक पेज पर सूचित करें|

3 Comments

  1. Satish Pandey - September 16, 2020, 7:24 am

    Nice

  2. Pragya Shukla - September 16, 2020, 3:07 pm

    Good

  3. Pt, vinay shastri 'vinaychand' - September 16, 2020, 4:55 pm

    सुंदर

Leave a Reply