आई

आई तुझ्यासाठी मी काय लिहू,
आणि किती लिहू,
तुझ्या महितीसाठी शब्दच अपुरे आहेत,
तुझ्यासमोर सगळे जगच फिके आहे।।

आई तुझ्या बद्दल बोलायला मला
शब्दच उरणार नाहीत.
आणि तुझे उपकार फेडायला मला
हजारो जन्म पुरणार नाहीत।।

आजपर्यंत तू माझा प्रत्येक हट्ट पूर्ण केला,
अगदी निस्वार्थ भावनेने,
तसेच माझी काळजी घेतलीस निष्ठेने.

माझ्या आयुष्यातील शांतता तू,
माझ्या मनातील गारवा तू,
अंधाऱ्या आकाशातील चंद्र तू, माझ्या आयुष्यातील चांदणे तू,

ढगाळ वातावरणातील पावसाच्या सरी तू,
मला वाट दाखवणारा रस्ता तू,
माझा भास तू, माझा श्वास तू,
माझ्या कवितेतील शब्द तू,
माझी भक्ती तू, माझी शक्ती तू,

माझ्या चेहऱ्यावरील हास्य तू!!

Comments

3 responses to “आई”

  1. Kanchan Dwivedi

    Good

  2. Satish Pandey

    Very nice

  3. Satish Pandey

    वाह

Leave a Reply

New Report

Close