Marathi Prem Kavita
माझ्याशी आजकाल हे घडते विचित्र आहे
माझ्याशी आजकाल हे घडते विचित्र आहे ,
डोळ्यापुढे माझ्या गा तुझेच चित्र आहे
तुझे रूपवर्णन करण्यापलीकडे शब्दही अपुरे ,
हातात माझ्या अझुनी ते अपूर्ण पत्र आहे
एका कटाक्षाने घालीले भुरड असे हृदयाला
हा तळमळतो तुझ्यासाठी,धीर देतो मी पात्र आहे
ओढणीच्या ढगाला सरसावून बघणं झरा चंद्रमुखी ,
विखुरलेल्या वस्तीत ग काळोख सर्वत्र आहे
प्रत्येक दिवस मोहरतो मिळण्याच्या तृप्त आशेने ,
स्वनांच्या गंधात बहरलेली प्रत्येक रात्र आहे
आज कळलय मला गगन रूप खरे प्रेमाचे
ना वैरी कुणी प्रेमासारखा ना कुणी मित्र आहे ।
बेहतरीं
Good
वाह
Wow
Nice
Good